Flowers
<b>फुलांची शिकवण </b>
🌹 *गुलाब* सांगतो-
येता-जाता रडायच नसत,
काट्यात सुद्धा हसायच असत..✍🏼
*रातरानी* म्हणते-
अंधाराला घाबरायच नसत,
कालोख्याताही फुलायच असत..✍🏼
🌼 *सदाफुली* सांगते-
रुसून रुसून राहायच नसत,
हसून हसून हसायच असत;
🌸 *बकुळी* म्हणते-
सावळ्या रंगाने हिरमुसयाचे नसते,
गुणाच्या गंधाने जिंकायचे असते..✍🏼
🌺 *कमळ* म्हणतो-
संकटांच्या चिखलात बुडायच नसत,
संकटांना बुडवून फुलायच असत..✍🏼
🙃😌🙃😌
( 🙏🏼काळजी घ्या अन् 😃आनंदी रहा )
Comments
Post a Comment